Ticker

6/recent/ticker-posts

नागनाथवाडी सोसायटीची ७३ वी वार्षिक सर्वसाधारणसभा संपन्न



 बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

संस्थेची२०२४_२५याआर्थिक वर्षाची ७३वी वार्षिक सर्वसाधरणसभा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे युवा संचालक मा.राहुल विठ्ठलराव फडतरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच संस्थेचे चेअरमन श्री अर्जुन फडतरे यांच्या अध्यक्षतेखाली वव्हा.चेअरमन श्री प्रकाश घाडगे संचालक श्री. शेखर फडतरे, श्री.कृष्णात खापे, श्री.बाजीराव फडतरे, सौ.कान्होपात्रा फडतरे,श्रीमती शकुंतला जगताप, श्री नामदेव शिरतोडे, श्री.संजय गुरव, स्वीकृत संचालक श्री शत्रुघ्न जगताप श्री. अशोक गुरव,सरपंच स्वप्नील तांबे,  विकास घाडगे,शिवाजी फडतरे, शिवाजीराव गुरव ,धीरज फडतरेयांचे उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली . यावेळी सोसायटीचे सभासद शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. 

       या सभेस संस्थेचे मार्गदर्शक श्री. धैर्यशील फडतरे व विकास अधिकारी श्री.मुकुंद लावंड यांनी मार्गदर्शन केले . सचिव श्री.धनाजी यादव यांनी आढावा,ताळेबंदाचे,अंदाजपत्रक वाचन केले, अध्यक्षीय भाषणात श्री.अर्जुन फडतरे यांनी संस्थेच्या आत्तापर्यंतच्या यशस्वी वाटचालीसोबत संस्थेच्या लाभांश वाटपाची परंपरा कायम राखत यावर्षीही उच्चांकी १५% लाभांश जाहीर करत नागनाथवाडी सोसायटी तालुक्यात अग्रगण्य व ऑडिट वर्ग " अ" संस्था असल्याचे नमूद केले. यावर्षीही संस्थापातळीवरही व बँकपातळीवर १००% वसुली झाल्याबद्दल संचालक, ग्रामस्थ शेतकरी सभासदांचे अभिनंदन केले. मा. उपसरपंच शिवाजी पांडुरंग फडतरे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.