Ticker

6/recent/ticker-posts

वाचनाने विचाराच्या कक्षा रुंदावतात -श्री. एस. आर. पाटील



 बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]

 वाचनाने भाषा सुधारते. शुद्धलेखन सुधारते. मेंदूची क्षमता वाढते. एकटेपणा राहत नाही. ग्रंथ हेच आपले खरे मित्र असून वाचनाने मेंदूची मशागत होते व विचाराच्या कक्षा रुंदावतात. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मध्ये वाचन संस्कृती जपण्याचे नेहमीच प्रयत्न केले जातात तसेच गुणवत्तेबरोबर संस्कार जपणाऱ्या या शाळेत विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव दिला जातो. तसेच विद्यार्थ्यांनी वृत्तपत्राचे नियमित वाचन करावे महत्त्वाच्या नोंदी डायरीत लिहून ठेवाव्यात .

असे मत श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावचे विश्वस्त श्री. एस. आर. पाटील (सर) यांनी व्यक्त केले. श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगाव येथे भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. श्री यशवंत घुगरे  यांनी प्रास्ताविक केले. श्री मोहनराव गुरव व श्री गोवर्धन जाधव ग्रंथपाल यांनी उपस्थितांचे   स्वागत केले. कार्यक्रमास प्राचार्य श्री दत्तात्रय गोपने, वोकेशनल विभाग प्रमुख  प्रा. जे. बी. जाधव, सौ. लाड तसेच विद्यार्थी, शिक्षक, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 संस्था अध्यक्ष डॉ. श्री. सुरेशराव जाधव, उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब जाधव, सचिव श्री. मोहनराव जाधव, खजिनदार श्री लक्ष्मणराव जाधव, सर्व संस्था पदाधिकारी, विद्यार्थी गुणवत्ता वाढ प्रकल्पाचे श्री. के.डी. पवार (सर), श्री जयंतराव जाधव,श्री.  डी. पी. शिंदे  ( सर) यांनी यानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या.श्री रानाप्पा बडचिकर यांनी आभार मानले.सौ. अमृता जाधव यांनी सूत्रसंचालन केले.