प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
विदर्भ माझ्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा काळानुरूप बदलला पाहिजे तो आत्मनिर्भर बनला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभे राहत असताना, सामाजिक जीवन जगत असताना, प्रत्येक अडचणीला तोंड देण्यासाठी तो समर्थ बनला पाहिजे आणि ध्येयाच्या उच्च शिखरावर पोहोचल्यानंतर त्याने आपल्या आई-वडिलांना वडीलधारी माणसांच्या कष्टाची व त्यांच्या भावानेची कदर त्यांच्या मनात रुजली पाहिजे, आणि त्यातूनच माझ्या आई वडिलांनी माझ्या साठी काय केले, याची सातत्याने जाण माझ्या विद्यार्थ्याला राहिली पाहिजे ,त्यामधूनच माझ्या विद्यार्थ्यांनी सामाजिक, कौटुंबिक नैतिकता सामाजिक मुल्य जोपासण्यासाठी त्यांच्यामध्ये उपजत सुसंस्कार निर्माण झाले पाहिजे, तो आत्मनिर्भर, बलशाली बनला पाहिजे, सामाजिक जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये तो यशाच्या दिशेने वाटचाल त्यांनी केली पाहिजे या एकमेव उद्देशाने व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या भौतिक सुविधा आणि मार्गदर्शन माझ्या गाव खेड्यातील विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजे
या साठी घाटबोरी सारख्या आदिवासी बहुल भागात छत्रपती शाहूमहाराज विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आपल्या पगाराच्या पैशातून खर्च करून वेगवेगळे उपक्रम राबवणारे संतोष डोंबळे यांचं मनापासून अभिनंदन, जिल्ह्यातील स्काऊट गाईड चा मेळावा आपल्या शाळेत खेचून आणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांचे कलात्मक गुणांची जाणीव त्यांनी करुन दिली तालुकास्तरावरील खेळाचे सामने आपल्या शाळेत आणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थी कसा राहतो याची जाणीव करून देणारे आणि आता माझ्यासाठी धडपडणारे माझे आई वडील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आई वडिलांची ही भावना बिंबवण्यासाठी उद्याला होऊ घातलेला कार्यक्रम छत्रपती शाहू महाराज विद्यालया घाटबोरी परिसरातील विद्यार्थ्यांना निश्चित सुसंस्कारित करून सोडेल या शंका नाही.
या परिसरातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विज्ञा सुसंस्कृतीत केल्याशिवाय राहणार नाही असे वाटते आणि म्हणून कोणत्याही प्रकारचे वाजागाजा न करता ज्येष्ठांना श्रेष्ठांना महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या उदयोन्मुख व्यक्तींना, मान्यवरांना आपल्या शाळेत आणून त्यांचं मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी धडपडणारे संतोषजी डोंबळे यांचे मनातून आभार आणि त्यांना शुभेच्छा





Social Plugin