परतूर प्रतिनिधी:-लक्ष्मण बिल्हारे
डॉ. स्वप्नील बी. मंत्री — मुख्य प्रदेश प्रवक्ते तथा मुख्य प्रदेश समन्वयक, भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश* यांच्या संकल्पनेतून निर्मित “नमो देवा भाऊ हृदय संजीवनी किट” या अभिनव आरोग्य उपक्रमाचे भव्य विमोचन दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात आ. तथा माजी मंत्री श्री बबनराव लोणीकर आणि भाजपा प्रदेश सचिव श्री राहुल भैया लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या किटविषयी माहिती देताना डॉ. स्वप्नील बी. मंत्री म्हणाले की, “नमो देवा भाऊ” ही संकल्पना म्हणजे आपल्या जनतेच्या हृदयाशी जोडलेले तीन आदरणीय नेते —पंतप्रधान नरेंद्र मोदी (नमो),मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवा) आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर (भाऊ) — यांच्या सेवा व समर्पण कार्यप्रणाली प्रेरणेतून घेतलेली आहे.
हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्यास किंवा त्याची प्राथमिक लक्षणे जसे धाप लागणेघाम येणे छातीच्या मध्यभागी वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे लक्षणे दिसल्यास तत्काळ उपयोगी पडणाऱ्या औषधांसह आवश्यक मार्गदर्शन या हृदय संजीवनी किट मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. आपत्कालीन स्थितीत रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी ही किट अत्यंत प्रभावी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपा प्रदेश सचिव राहुल भैया लोणीकर यांनी या अभिनव संकल्पनेचे कौतुक करत म्हटले की, “आरोग्यसेवा हीच खरी राष्ट्रसेवा आहे. अशा उपक्रमातून भारतीय जनता पक्षाची जनतेप्रती असलेली जबाबदारी स्पष्ट दिसून येते."
यावेळी बोलताना आ. बबनराव लोणीकर म्हणाले, “हा उपक्रम लोकांचे जीव वाचविण्यात आणि समाजात आरोग्य जनजागृती निर्माण करण्यात मोठी भूमिका बजावणार आहे. डॉ. स्वप्नील मंत्री यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेले हे योगदान कौतुकास्पद असून प्रत्येक कार्यकर्त्याने या किटचा प्रसार करावा.”
या कार्यक्रमास भाजपा तालुका अध्यक्ष शत्रुघ्न कणसे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संभाजी घनवट, परतूर डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉ प्रदीप सातोनकर, सचिव डॉ संदीप चव्हाण, डॉ सुधीर आंबेकर, डॉ नवल, डॉ अंभुरे, डॉ आकात, डॉ मद्रे, डॉ राजगोपाल तापडिया, डॉ कल्याण बोनगे, डॉ संजय सोळंके, डॉ दीपक कंदोई, डॉ हरिप्रसाद ढेरे, डॉ घुले, अजित पोरवाल, रवी मुंदडा, अनिल अग्रवाल, अमोल अग्रवाल, सौरभ बगडीया, आनंद कोटेचा, नरेश कांबळे, वैभव नरवडे, पूनम फुलमाली, परतूर शहरातील नामांकित डॉक्टर्स, वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक* मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin