Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगाव -कला व वाणिज्य महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम



 

बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

वाचन हे केवळ माहिती मिळविण्याचे साधन नसून ते चिंतन, मनन आणि सृजनशीलतेला चालना देणारे माध्यम आहे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद प्रा.डॉ.संजय क्षीरसागर यांनी केले. पुसेगाव येथील, कला व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती महान शास्त्रज्ञ आणि युवकांचे प्रेरणास्थान डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती" वाचन प्रेरणा दिन" म्हणून अत्यंत प्रेरणादायी वातावरण साजरी करण्यात आली. व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी. भोसले ,प्रा,डॉ.संजय क्षीरसागर, प्रा.डॉ.ए.एस. जगताप ,प्रा.डॉ.एन.डी. लोखंडे, प्रा.डॉ.एच.जी.निमसे प्रा.श्रीमती एम.बी. सोनार इत्यादी उपस्थित होते.पुढे आपल्या भाषणात डॉ. क्षीरसागर म्हणाले, डॉ. कलाम यांचे जीवन व विचार हे एक प्रेरणादायी आहे.म्हणूनच तरुणांनी दररोज वाचन करण्याची सवय अंगीकारल्यास ते उज्वल भविष्य घडवू शकतात .त्यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची भूमिका आणि वाचन संस्कृती या विषयावर अतिशय माहितीपूर्ण मार्गदर्शन केले. ग्रंथालय ही ज्ञानाची खाण आहे. 

वाचन ही वैयक्तिक समृद्धीचे आणि समाज परिवर्तनाची शक्ती आहे. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना वाचनाचे भाषिक कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकासातील योगदान यावर प्रकाश टाकला. वाचनामुळे केवळ ज्ञान मिळते व विचार करण्याची प्रश्न विचारण्याची आणि उत्तरे शोधण्याची वृत्ती ही माणसांमध्ये आपोआप निर्माण होते. लेखक मनोगतामध्ये प्रा. डॉ एन.डी.लोखंडे, प्रा.डॉ.एम. एस. वाघ यांनी वाचनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रम प्रसंगी   ग्रंथालयामध्ये पुस्तक प्रदर्शन आयोजित केले होते. व विद्यार्थ्यांना संदर्भ ग्रंथ, विविध विषयावरती नियतकालिके, मासिके ,पुस्तका विषयी माहिती सांगितली. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी भोसले म्हणाले, "आजच्या डिजिटल युगात वाचनाची सवय लोक पावत चाललेली आहे .

परंतु पुस्तके आपल्याला वैचारिक समृद्धी, आकलन शक्ती आणि आत्मिक समाधान देतात. वचना हा शाश्वत विकासाचा मार्ग आहे. असे विचार विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एल.के. पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.श्रीमती एम.बी सोनारी यांनी केले .तर आभार प्रा.डॉ.किरण कुंभार  यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी ,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.