Ticker

6/recent/ticker-posts

धनगर मेंढपाळ बांधवांमुळे वाचला हरणाच्या पाडसाचा जीव



*सामाजिक वन विभागातील बी.एम पाटील यांना आपल्या कर्तव्याचा विसर*

अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

अंबड शहरातील चांगले नगर भागात राहणारे मेंढपाळ बांधव गणेश रांजणे नित्यनियमाने रानात मेंढ्या चालण्यासाठी गेले असता हरणाच्या कळपातून एकटे राहिलेले हरणाचे पाडस कुत्र्याच्या तावडीत सापडलेले दिसले.गणेश रांजणे धावत पळत जात कुत्र्याच्या तावडीतून हरणाच्या पाडसाची सुटका केली.हरणाच्या पाडसाचे अनेक ठिकाणी लचके तोडलेले होते व रक्तबंबळ जखमी अवस्थेत होते. 

हरीने कायद्यानुसार पाळले जाऊ शकत नाही व त्याबाबत कठोर नियम असल्याची माहिती मेंढपाळ गणेश राजणे यांना होती त्यामुळे त्यांनी वनविभागातील कर्मचाऱ्यांना फोन केला परंतु त्यांना प्रतिसाद देण्यात आला नाही.त्यानंतर शिक्षक अनिल भालेकर यांना फोन करून या गंभीर परिस्थिती जाणीव करून दिली असता अनिल भालेकर हे ताबडतोब मेंढपाळ बांधव यांच्याकडे घटनास्थळी रवाना झाले.या गंभीर परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी वारंवार वनाधिकारी बी एम पाटील यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना कसल्याही प्रतिसाद देण्यात आला नाही. 

वन्य प्राण्याचा जीवन मरण्याचा प्रसंगी वनाधिकारी यांनी कुचराई व हलगर्जीपणाबद्दल प्राणी प्रेमी व अंबड शहरातील जनतेमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.जखमी हरणाच्या पाडसाला वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे असल्यामुळे अंबड शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात ताबडतोब देण्यात आले यानंतर अनेकांनी वनविभागातील अधिकाऱ्यांना फोन केले असता ते पशुवैद्यकीय दवाखान्यात हजर झाले.दुर्दैवाने पशुवैद्यकीय दवाखाना देखील बंद होता.या ठिकाणी एकही कर्मचारी कर्तव्यावर दिसून आला नाही. 

वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या ताब्यात जखमी हरणाचे पाडस देत गणेश राजने व अनिल भालेकर यांनी आपले कर्तव्य बजावत पाडसाचा जीव वाचवला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.परंतु वन विभागातील जबाबदार अधिकारी आपल्या कर्तव्यात किती हलगर्जीपणा करतात? याचे आश्चर्य व संताप जनतेमधून व्यक्त केला जात आहे.