Ticker

6/recent/ticker-posts

सोयाबीन पिकाला लागली अचानक आग; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान



 प्रतिनिधी: अमर बनसोडे 

शेतात ठेवलेल्या सोयाबीन पिकाला अचानक लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी ही घटना घडली असून, आग लागण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने जीवितहानी टळली. महसूल व पोलिस विभागाने पंचनामा करून नुकसानाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदतीची मागणी केली आहे.