बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
ज्ञानदीप को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबईचे संस्थापक-अध्यक्ष विश्वनाथ गोविंद पवार व अनुप विश्वनाथ पवार यांनी श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या अन्नदान कक्ष बांधकामास दहा लाख रुपयांची देणगी श्री सेवागिरी चरणी अर्पण केली. यापैकी उर्वरित पाच लाख रुपयांच्या रकमेचा धनादेश श्री. पवार यांनी ट्रस्टकडे सुपूर्द केला.
याप्रसंगी देवस्थानचे मठाधिपती १०८ श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, सचिव विशाल माने व भाविक उपस्थित होते. दरम्यान, दीपावलीच्या निमित्ताने श्री सेवागिरी महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. यावेळी मंदिरात 'श्री सेवागिरी महाराज की जय'चा जयघोष करण्यात आला. दिवसभर श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
.jpg)




Social Plugin