Ticker

6/recent/ticker-posts

संकल्प फाउंडेशनतर्फे सोलापूर पुरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य वाटप



दुधगांव- सोलापूर जिल्ह्यातील मुंढेवाडीत पुरपरिस्थितीत बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी संकल्प फाउंडेशनतर्फे मदत वितरण उपक्रम राबविण्यात आला. पूरग्रस्त कुटुंबांच्या तात्काळ गरजा लक्षात घेऊन अन्नधान्य, कपडे, साड्या, शैक्षणिक साहित्य, तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे सुयोग्य नियोजन करून मुंढेवाडी येथे वितरण करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत एकूण १६० कुटुंबांपर्यंत मदत साहित्य पोहोचविण्यात आले. स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या समन्वयातून लाभार्थींची नोंदणी करून वाटप प्रक्रिया पार पाडण्यात आली.

संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष निखिल नलवडे यांनी या मदतकार्याला हातभार लावणाऱ्या दुधगांव मधील सर्व स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते, दाते आणि स्थानिक अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच इथून पुढे सेवा-शिक्षण-आरोग्य-पर्यावरण-आपत्कालीन मदतकार्य यावर संस्था काम करणार, असे त्यांनी नमूद केले.

        यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रोहित शिपुगडे, खजिनदार अमोल यादव, सचिव शरद माने, व जय हनुमान मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.

--