महादेव सोनुने ग्रामीण प्रतिनिधी रहाटणी,
पिंपरी-चिंचवड – झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून माननीय श्री. दशरथ कांबळे साहेब यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. यांनी नवीन पदभार स्विकारल्याबद्दल त्यांचा सत्कार अल्पसंख्यांक विकास महासंघाचे शहर अध्यक्ष जावेद शहा आणि राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्कार समारंभ प्रसंगी दोन्ही नेत्यांनी श्री. कांबळे साहेबांच्या कार्यतत्परतेचे कौतुक करत, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसनाच्या कामात सामाजिक न्याय आणि पारदर्शकता राखण्याची अपेक्षा व्यक्त केली.या प्रसंगी स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)




Social Plugin