मालेगाव प्रतिनिधी जावेद धनु भवानीवाले
जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात म्यानमार देशातील दोन पर्यटक जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी तर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.
ही सदर घटना समृद्धी महामार्गावरील लोकेशन क्रमांक २३२,/३०० डव्हा - जऊळका १७ ऑक्टोबंरच्या रात्री २ वाजताच्या सुमारास घडली आहे .
याबाबत सविस्तर असे की, मुंबईहून जगन्नाथपुरी दर्शनाला जात असलेली इनोव्हा चारचाकी वाहन क्रमांक एमएच ०१ बीबी १२१५ या वाहन चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने थेट वाहन थेट वाहन रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळले.अपघात एवढा भीषण होता की,वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे छिन्नविछिन्न झाला आहे.
या वाहनात ७ विदेशी पर्यटक प्रवाशी होते. या भीषण अपघातात पर्यटक मिन ऑग (वय ३३), मिन चित ऑग (वय १३), राहणार म्यानमार देश या दोघांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी, तर चार जण किरकोळ झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच जऊळका पोलिस घटनास्थळी दाखल झाले , पुढील अधीकचा तपास सुरू आहे. जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय वाशीम येथे उपचार सुरु आहेत. या घटनेत समृध्दी महामार्गावरील अपघात प्रसंगीची तातडीची मदत करणारी यंत्रणा पुन्हा कुचकामी असल्याचेच सिध्द झाले आहे.





Social Plugin