Ticker

6/recent/ticker-posts

जि. प. हायस्कूल साकरीटोला येथे दीप दानोत्सव मोठ्या उत्सवात साजरा



 जितेंद्र बहेकार 

तालुका प्रतिनिधी

आमगाव.


दि. १८/१०/२०२५ रोजी शनिवारला जि. प. हायस्कूल साकरीटोला येथे दीपावली च्या पूर्वसंध्येला सकाळी ७ ते ११:३० पर्यंत दीपदान उत्सव साजरा करण्यात आला. वर्ग ५ ते १२ च्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम नावीन्यपूर्ण ठरला. अकाशदीप, दीप सजावट, भेट कार्ड, रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा, गायन स्पर्धा , वृक्ष लागवड अशा विविध उपक्रमात विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभागाने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य उभारले. सहकार्याच्या भावनेतून संपूर्ण शाळा आकशदीप, भेटकार्ड, रांगोळींनी सजविल्या गेली. विविध स्पर्धांचे आयोजन झाल्यानंतर संपूर्ण विद्यार्थ्यांनी सुरुची भोजचा आस्वाद घेतला.

     जि. प. हायस्कूल चे प्राचार्य मा. जी. जे.परदेशी सर यांच्या कल्पणेतून आणि मार्गदर्शनातून दीपदान उत्सव आज साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन मा. एस. एच.कटरे सर यांचे होते. तर मा. टी. वाय.पवार सर, थेर सर यांची भूमिका महत्वाची ठरली. कार्यक्रमाला विशेष सहकार्य मा. कापगते सर, मा. कोडापे सर, मा. वासनिक सर, मा. दोनोडे सर, मा. खरवडे सर, मा. कटरे सर, मा. बिलथरे सर मा. धूवाधापाडे मॅडम, मा. चौधरी मॅडम, मा. कटरे मॅम, टेंभूनिकर मॅम,मा.गौतम मॅम, मा. बैस मॅडम, मा. खंडाईत मॅडम, मा. हरिनखेडे मॅडम यांचे लाभले.

शाळेतील परिचर, आणि शालेय पोषण आहार तयार करणारे स्वयंपाकी ताई  यांच्या मदतीने दीपदानोत्सव साजरा करण्यात आला.