Ticker

6/recent/ticker-posts

माजी जि.प.अध्यक्ष कै.रावसाहेब मोरे यांचे चिरंजीव मनोज मोरे यांनी त्यांच्या असंख्य समर्थकासह भाजपा प्रवेश!



भगवान ढगे अंतरगाव नायगाव प्रतिनिधी

दि.26/10/2025 रोजी नायगाव तालुक्यातील बरबडा सर्कल मधील टाकळी बु येथील माजी जि.प.अध्यक्ष कै.रावसाहेब मोरे यांचे चिरंजीव मनोज मोरे यांनी त्यांच्या असंख्य समर्थकासह भारतीय जनता पार्टीत माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण व आ.राजेश पवार यांच्याहस्ते जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी भाजपा महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर , भाजपा जिल्हा सरचिटणीस सौ.पूनम पवार , मारोतराव कवळे, नायगाव दक्षिण ता.अध्यक्ष श्रीहरी देशमुख, नायगाव उत्तर ता.अध्यक्ष बालाजी मद्देवाड , बापूसाहेब कौडगाव, दत्ता पा.ढगे, भाजपा अनु.सूचित जाती जिल्हाध्यक्ष मनोहर पवार, लक्ष्मण हस्सेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.