Ticker

6/recent/ticker-posts

जामनेर नगरपालिका प्रभाग क्रमांक १ अ आरक्षित मधून ,प्रथम भाजप कडून इच्छुक उमेदवार-शाम भाऊ गंगातिरे

 



यांनी आपला उमेदवार कसा असावा यावर प्रकाश टाकत रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली असून ,जनमानसातून सकारात्मक प्रतिसाद त्यांना मिळत आहे.त्यांनी खालील प्रमाणे त्यांच्या भावना बोलून दाखवल्या आहेत,

मी श्याम सिताराम गंगतिरे तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो कि येणारा काळ हा लोकशाही चा उत्सव म्हटल्या जाणाऱ्या निवडणुकीचा काळ आहे... मी बघतो आहे सगळीकडे धुमाकूळ सुरु आहे.... मी उमेदवार,, मी उमेदवार.. मी.. मी.. मी.. इ. पोस्ट फिरत आहे ... सगळीकडे कारण हे युग सोशल मीडिया चं आहे सर्वांचं म्हणणं झालं कि तुम्ही शांत राहून चालणार नाही, तुम्ही आमच्यासाठी व आम्ही तुमच्यासाठी असतांना तुम्ही मागे राहू नका काही तरी बोला... तुमच्या बाबतीत कुणी पोस्ट टाको ना टाको आम्हाला तुमच्याच शब्दांची आवड आहे तुम्हीच बोला व सुरुवात करा आम्ही सदैव तुमच्या सोबत आहे म्हणून सांगतो,,,,,,

मी ऐक सामान्य रा. स्व. संघाचा स्वयंसेवक आहे... बालपनापासून रा. स्व. संघांचे अविरत काम करत आलो आहे आपल्याच जामनेर तालुक्याची सेवा सुद्धा जबाबदारी पूर्वक पार पाडून सर्व समाजाची किंबहुना देशाची सेवा केली आहे संघाची आता सध्या कुठलीही जबाबदारी नसली तरी सर्व समाजाचे सर्व समावेशक काम मी काही बंद केलेले नाही ते यापुढेही सुरूच राहणार.. हा,,पण माझ्या स्वयंसेवक वृत्ती मुळे प्रसिद्धी नं करता कार्य करत राहणे.. मग कुणाचं सुख दुःख असो, कुणाला चांगल मार्गदर्शन असो की कुणाच्या मदतीला धावून जाणं असो ती नं थांबणारी प्रक्रिया आहे जी मी जीवन जगतांना जगतो आणि हा, उजव्या हाताने केलेले डाव्या हाताला पण कळू नं देणारा मी,,पण जग बदलत चाललं आहे म्हणून हा प्रपंच!!!

तसं  मी 2013..नगरपरिषद जामनेर मध्ये भारतीय जनता पार्टी व अपक्ष असे फॉर्म भरून, "अपक्ष "निवडणूक लढलो तेव्हा मला त्या एव्हडया बिकट काळात,,313..मते देऊन भरभरून प्रेम दिलं गेलं ती ऐक माझ्या व माझ्या सर्व सवनगड्यांच्या चांगल्या कामाची, कार्याची व कर्तृत्वाची पावतीच होती.. नंतर पुन्हा पुढील निवडणुकीत फक्त भारतीय जनता पार्टी कडून फॉर्म भरला संधी नाही मिळाली पण पक्ष आदेशा नुसार सर्वांसोबत खांद्याला खांदा लावून नियोजन पूर्वक काम केलं.. पण आता पुनःरूपी मला संधी चालून आली असल्या मुळे वार्ड क्र. 1 अ मधून अनुसूचित जाती  या प्रवर्गातून सर्वांच्या आग्रहाखातर निवडणूक लढवून पुन्हा एकदा तुमच्या प्रेम व आशीर्वादाची इच्छा ठेवतो व तुम्ही साथ देणारंच एव्हडी आशा बाळगतो व ऐक पाऊल पुढे टाकतो मी सदैव या माध्यमातून तुमच्या साठीचं काम करत राहायचं निश्चित केलं आहे मी रा. स्व. संघाचा स्वयंसेवक कार्यकर्ता असल्याने मी भा. ज. पा. निष्ठावान कार्यकर्ता सांगण्याची मला तरी गरज वाटत नाही तो मी आहेचं!!!

कुठल्याही जाती पातीच्या राजकारणा पलीकडे जाऊन माझं जीवन सर्व समाजासाठीच आहे तसेच, सर्व समाज माझे व मी सर्व समाजाचा,,,याचं भावनेतून व मा. ना. गिरीष भाऊ महाजन यांचे तरुणाई विषयीचे विचार व आजच्या पिढीसाठी आणि सर्व समाजाच्या कार्य पूर्तीसाठी मी भारतीय जनता पार्टी कडून इच्छुक उमेदवार आहे....शाम भाऊ गंगातिरे हे आतापर्यंत स्वाभिमानी नागरिक म्हणून ओळखले गेले आहेत,त्यांचा साधापणा,हाच त्यांच्या निवडून येण्यासाठीचे चिन्हे आहेत.पुढील निवडणुकीसाठी त्यांना नागरिकांकडून शुभेच्छा मिळत आहे.