अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
घनसावंगी तालुक्यातील कंडारी येथील ब्लू सफायर फूड प्रोसेसिंग प्रा.लि.मध्ये तृतीय गळीत हंगाम २०२५-२६ चा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ रविवारी मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. औद्योगिक विकासाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असून,परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या अर्थचक्राला गती देणारा हा महत्त्वपूर्ण सोहळा ठरला.
कंपनीच्या यशस्वी वाटचालीतील पुढील टप्प्याची सुरुवात म्हणून ओळखला जाणारा हा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ ऊस उत्पादक शेतकरी,कामगार, अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या मंगलमय सोहळ्याचा शुभारंभ कंपनीचे आधारस्तंभ श्री. निळकंठ अण्णासाहेब उढाण आणि सौ.निर्मलाताई निळकंठ उढाण यांच्या शुभहस्ते विधिवत अग्निप्रज्वलन करून करण्यात आला.गळीत हंगामाच्या यशस्वीतेसाठी व शेतकरी बांधवांच्या समृद्धीसाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली.
याप्रसंगी आमदार हिकमत दादा उढाण,सौ.मायाताई हिकमत उढाण,डॉ.राजन उढाण,सौ.मंजुषा राजन उढाण,सुभाष दादा उढाण यांची विशेष उपस्थिती लाभली.तसेच कारखान्याचे चेअरमन दिलीप जिजा उढाण, जनरल मॅनेजर केरुरकर साहेब, चीफ केमिस्ट करे साहेब,शेतकी अधिकारी डाके साहेब,चीफ अकाउंटंट मुगळे साहेब,एच. आर.मॅनेजर पांचाळ साहेब, सुरक्षा अधिकारी खंडागळे साहेब यांच्यासह सर्व विभागप्रमुख, कर्मचारी,कामगार आणि परिसरातील असंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या समारंभाने ब्लू सफायर फूड प्रोसेसिंग प्रा.लि.ने केवळ आगामी गळीत हंगामाचा श्रीगणेशाच केला नाही,तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्याच्या आपल्या कटिबद्धतेची पुन्हा एकदा ग्वाही दिली.





Social Plugin