*भास्कर आबांना सोबत घेऊन बुद्ध विहाराच्या विकासासाठी निधी आणणार - आ.कुचे*
अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
धम्मसाधना बुद्धविहार,गणेशनगर-योगेशनगर, जालना या विहाराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे व मा.आ.नारायण भाऊ कुचे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस तसेच सामाजिक न्याय मंत्री मा.ना.संजयजी सिरसाठ यांच्याकडे पाठपुरावा करून निधी आणून धम्मसाधना बुद्ध विहाराचा सर्वांगीण विकास करू असे वर्षावास समारोपानिमित्त चिवरदान व धम्मदेशना कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर बदनापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार नारायणभाऊ कुचे,भंतेजी राजरत्न,धम्मसेविका सौ.वाघमारे आई,संस्थानचे अध्यक्ष दिलीपजी शिंदे,सचिव प्रमोदजी डोंगरदिवे, मा.जिल्हा सरचिटणीस देविदास देशमुख,स्वीय साह्यक राजेश जोशी,सुभाष दिघे,भाजपा महानगर जिल्हा चिटणीस सुमित सुरडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
धम्मसाधना बुद्ध विहाराच्या सर्वांगीण विकासासाठी भास्कर आबांना सोबत घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा करून भरघोस निधी खेचून आणू या बुद्ध विहाराच्या सर्वांगीण विकासाला आपला हातभार लावणार असे आमदार कुचे यांनी बोलताना सांगितले.
यावेळी बोलताना भास्कर आबा दानवे यांनी सांगितले की, धम्मसाधना बुद्ध विहारा मध्ये आपणास भगवान गौतम बुद्धांचे पंचरत्न करूना याचा साक्षात्कार होतो व प्रत्येक व्यक्तींनी जीवनामध्ये या पंचरत्नांचे काटेकोरपणे पालन केल्यास आपले ध्येय साध्य होते तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचरत्नाचे काटेकोर पालन करून जीवनाचे ध्येय साध्य केले.माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या माध्यमातून रु.५० लक्ष चा निधी मंजूर करून आणला असून उर्वरित कामासाठी लागणाऱ्या निधी करिता मा.दानवे साहेब आ.कुचे साहेब,मा.आ.कैलासजी गोरंटयाल साहेब यांच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा करणार असून उर्वरित विकास कामे त्या निधीतून पूर्ण केली जातील असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.दीपक भालेराव,अरुण डोंगरदिवे, प्रफुल शिंदे,श्री.गायकवाड सर,श्री.तुपे सर, श्री.साळवे सर,श्री.वाघ सर इत्यादीसह मोठ्या प्रमाणात माता भगिनी व वडीलधारी मंडळी उपस्थित होती.





Social Plugin