अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
सामाजिक बांधिलकी आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या महा पोलिस मित्र संघ,महाराष्ट्र राज्य मध्ये पुणे येथील तीन महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे.'जनसेवा,न्याय,सुरक्षितता' या ब्रीदवाक्यावर आधारित कार्यात हे नवनियुक्त सदस्य पुण्यात सक्रिय भूमिका बजावणार आहेत.
या नियुक्तीमध्ये विकास वसंत शेलार यांची पुणे कार्याध्यक्ष पदी,विनयाक महांदुळे यांची पुणे शहर उपाध्यक्ष पदी,आणि ज्योती सचिन शीलवंत यांची पुणे महिला जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.या तिन्ही उत्साही कार्यकर्त्यांना नुकतेच महा पोलिस मित्र संघाचे नियुक्ती पत्र व ओळखपत्र (ID Card) प्रदान करण्यात आले आहे.
*या सदस्यांचे कार्यक्षेत्र 'भारत' असे नमूद असून, त्यांची नियुक्ती ०७/१०/२०२६ पर्यंत वैध राहणार आहे.*
संस्थापक अध्यक्ष आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन महा पोलिस मित्र संघाचे संस्थापक अध्यक्ष अनिता लष्करे मॅडम आणि पवार साहेब यांनी या तिन्ही नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन केले आहे.त्यांनी विश्वास व्यक्त केला की,हे सदस्य त्यांच्या नवीन जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडतील आणि पुणे शहर तसेच जिल्ह्यात महा पोलिस मित्र संघाचे कार्य अधिक बळकट करतील.पोलिस मित्र म्हणून ते पोलिस प्रशासनाला मदत करतील आणि समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय राहतील.
या महत्त्वपूर्ण निवडीमुळे पुणे शहरातील महा पोलिस मित्र संघाच्या कार्याला एक नवी दिशा मिळणार आहे.





Social Plugin