निता तोडकर यांचा वाचन प्रेरक संमेलनात सहभाग व सन्मान
गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
वाचन संस्कृतीला आकार देणाऱ्या उपक्रमांमधून ‘पी. एम. श्री जिल्हा परिषद विद्यालय, कामरगाव’ या शाळेने राज्यभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका नीता तोडकर यांना 'वाचन प्रेरणा दिन २०२५' निमित्त महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालय, मुंबई तर्फे आयोजित राज्यस्तरीय “वाचन प्रेरकांचे संमेलन” या कार्यक्रमात सहभागी होण्याचा सन्मान प्राप्त झाला.
भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी “वाचन संस्कार, वाचन प्रेरणा” या विषयावर आभासी राज्यस्तरीय संमेलन आयोजित केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.श्रीधर नांदेडकर तर भाषा संचालक अ.वा.गिते व सचिव मराठी भाषा विभाग किरण कुलकर्णी यांची उपस्थिती होती. संमेलनामध्ये वाचक प्रेरकात शिक्षक, प्रकाशक व वाचना संदर्भात काम करणारे अनेक प्रेरक महाराष्ट्रभरातुन सहभागी झाले होते.या संमेलनात जिल्हा परिषद विद्यालय, कामरगावच्या नीता तोडकर यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या कार्याचा गौरव करत हा विशेष सन्मान देण्यात आला.त्यांनी आपल्या शाळेत मागील काही वर्षांपासून 'वाचन प्रेरणा अभियान' राबविले असून, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, अभिव्यक्ती आणि सर्जनशीलता विकसित व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न करतात आले आहेत.शाळेचे मुख्याध्यापक प्रा.सुरेश राठोड शाळेचे पर्यवेक्षक गोपाल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी वाचन कोपरा, कवितेची कास्तकारी, हस्तलिखित, प्रतिभा वार्षिक अंक,वाचन प्रेरणा दिन विशेष उपक्रम अशा अनेक नाविन्यपूर्ण कल्पना राबवून विद्यार्थ्यांना वाचनाचा नवा आनंद दिला आहे. यातून विद्यार्थी घडत आहेत राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांनी कवी संमेलन व परिसंवादात जवळपास २४ हजाराची बक्षिसे पटकावली होत. अखिल भारतीय साहित्य अंकुर संमेलनात आयोजित केलेल्या कवी संमेलनात आरुषी भुजाडे,जानवी देशमुख व धनश्री चौके या शाळेच्या विद्यार्थिनींनी नीता तोडकर व गोपाल खाडे यांच्या मार्गदर्शनात सुंदर सादरीकरण केले की त्यांचा सादरीकरण पाहून अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलनाने पुढच्या वर्षीपासून बाल कवीसंमेलन घेण्याचा ठराव पारित केला. शाळेने आपली हस्तलिखित तयार केले असून प्रतिभा हा वार्षिक अंक नव्याने सुरू केला आहे. आज शाळेचे शेकडो विद्यार्थी कविता लेखन करतात. पुस्तक वाचन करून पुस्तकावर आपले मत व्यक्त करतात. या सर्व संधी त्यांना शाळेत उपलब्ध करून दिल्या जातात.या सर्व उपक्रमांची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभागाने शाळेच्या प्रयत्नांचा गौरव केला आहे.या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळांनी निर्माण केलेली वाचन संस्कृती राज्यपातळीवर पोहोचल्याचं हे उदाहरण ठरलं आहे.
या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालक वर्गात आनंदाचे वातावरण असून,'कामरगाव शाळेचा वाचनप्रेरणेचा प्रवास आता राज्यपातळीवर झळकला' अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. सदर संमेलनाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक भारत जाधव यांनी केले





Social Plugin