Ticker

6/recent/ticker-posts

बडूर गणातून वंचीत चे, तालुका सदस्य मारोती एडकेवार इच्छुक.



देगलूर - प्रतिनिधी 

सगरोळी : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे, राजकीय आरक्षण जाहीर झाले. यात सगरोळी सर्कल, मधील बडूर गण हे अनुसूचित जातीसाठी, राखीव आहे. या गणातून वंचित बहुजन आघाडीचे बिलोली तालुका सदस्य,पत्रकार मारोती जकोजी एडकेवार, यांनी बडूर गणातून उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत,ग्रामीण भागातील सगरोळी सर्कलमधील, हिप्पारगा थडी येथील. रहिवासी आहेत, मातंग समाजाचे व बिलोली तालुक्यातील, आंबेडकरी, सत्यशोधक, वंचीत बहुजन आघाडीचे,युवा नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी मातंग समाजातील, व इतर सर्व समाजातील, गोरगरीब लोकांचे विधवा अपंग महिलांचे,तहसील असो ग्रामपंचायत असो, सर्व शासकीय कामे करून देतात हिप्पारगा थडी, येथील मातंग समाज समशानभूमीसाठी 2019 च्या पोटनिवडणुकीवर मतदानाचा बहिष्कार,टाकून शासनावरती दबाव आणण्यात आला. ग्रामीण भागातील प्रत्येक कार्यकर्त्यांसोबत जन सामान्य सोबत,असणारा जनसामान्य सत्यशोधक कार्यकर्ता म्हणून त्यांचे, ग्रामीण भागात मोठी ओळख आहे.वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, व पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य लोकांचा,आवाज उठवण्याचा कार्य सतत, करत आहेत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी व नांदेड जिल्हा कमिटी पक्षाने संधी दिल्यास,त्या संधीचं सोनं सगरोळी सर्कल व बडूर गणात,निश्चितच होईल सामान्य जनता, ही वंचित बहुजन आघाडी सोबत असून,सगरोळी सर्कल मध्ये उमेदवार कोणीही असो, वंचित चाच निवडून येईल. आणि वंचित बहुजन आघाडी सगरोळी सर्कल मध्ये,अकोला पॅटर्न राबवल्या जाईल,असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मारोती एडकेवार,यांनी मनोगत व्यक्त केले.