Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे व शेतकर्यांना हेक्टरी ५०००० रूपये‌ अनुदान देण्याची शिवसेनेची मागणी



अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

दि ०८/१०/२०२५ रोजी अंबड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात संपूर्ण कर्ज मागणी व सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी मध्ये बाधित झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाई पोटी ५० हजार रुपये प्रती हेक्टरी देण्यात यावी व पिक विम्याचे निकष पुर्वी प्रमाणे चार ट्रिगर ठेवण्यात यावे घरे,पशुधना साठी जुने निकष नलावता वाढीव मदत देणे बाबत अंबड तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले व मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी शिवसैनिकांनी कर्जमाफी झालीच पाहीजे,हेक्टरी ५०००० रुपये अनुदान मिळालेच पाहीजे अशा घोषणा दिल्या शिवसेना उपनेते सन्माननीय परभणी जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव,विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय अंबादास दादा दानवे जालना जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर,महेशराव नळगे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन अंबड तहसील येथे करण्यात आले.

त्याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख हनुमानजी धांडे,माजी तालुका प्रमुख अशोक बरडे,शिवसेना तालुका प्रमुख दिनेश काकडे,बाळासाहेब गावडे माजी शहर प्रमुख कुमार रुपवते,उपतालुकाप्रमुख विजय सोमाणी,कल्याण टकले,सिद्धेश्वर उबाळे,रजनिस कनके,प्रभु बामणे,अशोकराव खापे,बाबासाहेब निकम,अशोकराव गिरी,उल्हासराव वाघ,रमेश भाऊ वराडे,रवी दादा इंगळे,भाऊसाहेब तांबे,अंनिस तांबोळी,गजानन सानप,मुकुंद हुशे,शैलेश दिवटे,शाम राठोड,अंबादास मुळे,संदीप सदावर्ते,सुरेश राणा,महादेव लेकुरवाळे,सुनिल वाकणकर,गोरख डोखे,शिवराम भोजने,बाळासाहेब नारळे,विठ्ठल शिंदे,सिताराम विर,नाथा मिठे,कैलास खरात,अन्सार भाई व शिवसैनिक व पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते...