आमचे आदर्श गुरुवर्य तथा सौ. मंजुळाबाई हायस्कूल, खतगाव येथील अत्यंत उत्कृष्ट अध्यापन करणारे मराठी विषयाचे आवडते व प्रेरणादायी शिक्षक श्री कौठकर सर यांच्या सेवापूर्ती निमित्त सदिच्छा भेट घेता आली.. ज्यांनी अनेक विद्यार्थ्यांना आपल्या अध्यापनाच्या कौशल्याने प्रभावित करून प्रेरणा दिली आहे. अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविले आहे. त्यांची शैक्षणिक कारकीर्द अत्यंत उत्कृष्टपणे परिपूर्ण झाली. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात एक आवडते शिक्षक असतात, त्यापैकी एक म्हणजे आदरणीय श्री कौठकर सर आहेत.
आजही त्यांची शिकवण्याची पद्धत आम्हाला आदर्श वाटते. विद्यार्थी घडवण्यासाठी सामाजिक जाणिवेचा वसा त्यांच्या ठायी नेहमीच राहिला आहे. साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी हे त्यांची जीवनसूत्र सर्वांना अनुभवता आले. या सर्व जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन परिवारासमक्ष त्यांचा यथोचित सन्मान करण्याची संधी मिळाली. विद्यार्थी दशेतील मिळालेली ऊर्जा आजही आम्ही घेऊन आलोत. कमी वेळेत खूप चर्चा झाली. जुन्या नव्या पिढीच्या आठवणी निघाल्या. शिक्षक हे कायम विद्यार्थीच्या मनात घर करून असतात. एवढ्या वर्षा नंतर ही तोच जिव्हाळा आणि प्रेम मिळाले. याचे खूप समाधान वाटले... गुरू ची सदिच्छा भेट ही दिवाळीतील गोडवा आहे...यावेळी त्यांच्या सौभाग्यवती मॅडम व नातेवाईक, मुली आणि विद्यार्थी सहशिक्षक श्री गजानन देवारे, प्रा डॉ पांडुरंग पांचाळ आणि सहशिक्षक बालाजी कोकणे...m





Social Plugin