बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
सोलापूर जिल्ह्यातील नागरिक तसेच मराठवाड्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाने पुढाकार घेतला आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी एकत्र येत अन्नधान्य, सुकामेवा व इतर आवश्यक खाद्यपदार्थांचे संकलन केले आहे.पूरामुळे अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून तसेच जनतेच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तू जमा केल्या. संकलित साहित्यात तांदूळ, बिस्किटे, सुकामेवा, तसेच तत्काळ वापरता येणाऱ्या इतर खाद्यपदार्थांचा समावेश आहे.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी भोसले यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव ठेवून पुढाकार घेतला आहे, तसेच पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन माणुसकीचे दर्शन घडविलेले आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी ही मदत वेळेत पोहोचविली जाणार आहे.”राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.किरण कुंभार आणि प्रा.डाॅ.हनुमंत निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संकलन उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकाशी संवाद साधताना प्रा.डॉ.हनुमंत निमसे म्हणाले,"महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी घराघरात जाऊन मदत जमा केली असून पुढील टप्प्यात ही सामग्री जिल्हा प्रशासनामार्फत पूरग्रस्त भागात पाठविली जाणार आहे.
सामाजिक बांधिलकीतून प्रेरित होऊन राबविण्यात आलेला हा उपक्रम इतर महाविद्यालयांसाठी समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे,आजीव सभासद प्रा. डॉ.संजय क्षीरसागर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin