Ticker

6/recent/ticker-posts

येरगी बालिका पंचायत राज ने केला मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचा सत्कार



देगलूर: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत देगलूर येथील खानापूर रोडवरील महालक्ष्मी मंगल कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील चालुक्य कालीन नगरी येरगी चे बालिका पंचायत राज समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली यांचा सत्कार करून गावात या अभियानांतर्गत चालू असलेल्या सर्व कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी उप मुख्यकार्यकारी अधिकारी दत्तात्रेय गीरी, गावचे सरपंच संतोष पाटील, गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे, विस्तार अधिकारी दत्तात्रेय कुरूदे, बालाजी उमाटे, ग्राम पंचायत अधिकारी राजेश तोटावाड, इरवंत कालिंगवार, आदी उपस्थित होते.

तसेच यावेळी बालिका पंचायत राज चे सरपंच अंजली वाघमारे,उपसरपंच पुनम सुर्यवंशी, तंटामुक्त अध्यक्ष शिवकांता भुरळे, पोलिस पाटील अनिता बागेवार, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सपना काळीगवार, महादेव कुंचगे, मोनिका माळगे, रुक्मिणी भुरूळे, रूद्रानी चैडके, आश्विनी पाचांळ, रितीका चिटकुलवार, हरीका तोटावार,आदी उपस्थित होते.