Ticker

6/recent/ticker-posts

शॉर्ट सर्किटमुळे जळालेल्या ऊस पिकाची सतीश घाटगेंनी थेट बांधावर जाऊन केली पाहणी



*शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे  दिलं आश्वासन*

अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत तनवाडी-राहेरा येथील अनेक शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.या घटनेची माहिती मिळताच, समृध्दी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.सतीश घाटगे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला.

घडलेल्या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर श्री.घाटगे यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आणि त्यांना"सदैव शेतकऱ्यांसोबत"असल्याचे आश्वासन देत मदतीचा विश्वास दिला.

                            *तात्काळ तोडणीचे आदेश आणि महावितरणकडून भरपाईसाठी प्रयत्न*

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी श्री.सतीश घाटगे यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले.त्यांनी आपल्या समुद्धी साखर कारखान्याच्या यंत्रणेला सूचना दिल्या की,कारखाना सुरू होताच जळीत उसाची तोडणी तातडीने करावी.यामुळे ऊस पूर्णपणे वाळण्यापूर्वी तो कारखान्याला जाईल आणि शेतकऱ्यांचे होणारे अधिकचे नुकसान टळेल.

याव्यतिरिक्त,शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीकडून भरपाई मिळण्यासाठी केलेल्या मागणीनुसार,श्री.घाटगे यांनी महावितरण(महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड) कडून जळीत उसाची भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी जातीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

श्री.घाटगे यांनी दिलेल्या या आश्वासनामुळे आणि तातडीने मदतीसाठी उचललेल्या पावलांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे.