शैलेश बहुउद्देशीय सामाजिक संस्था राजनी या संस्थे अंतर्गत गावा मध्ये लक्ष्मी मंडळाच्या वतीने राबविण्यात आले स्पर्धा परीक्षा
-- सार्वजनिक तरुण उत्साही लक्ष्मी मंडळ यांनी व गाव कर्यानी शैलेश बहुउद्देशीय सामाजिक संस्था राजनी संस्था सचिव (डायरेक्टर) देवचंद कावळे यांचे केले सत्कार
तालुक्यातील राजनी येथे सार्वजनिक तरुण उत्साही लक्ष्मी मंडळांच्या वतीने दिनांक 25/10/2025 रोजी गोपाल काल्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल.
गेल्या 28 वर्षांपासून राजनी येथे मुख्य चौकात गावातील तरुण मंडळीनी मंडळ स्थापन करून गावात दिवाळी सन उत्साहात साजरा कसा करण्यात येईल म्हणून गावातिल मुख्य चौकात लक्ष्मी मातेची स्थापना करून दररोज विविध कार्यक्रम करून दिवाळी सन उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
दिनांक 25/10/2025 रोजी गोपाल काल्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी, शैलेश बहुउद्देशीय सामाजिक संस्था राजनी या संस्थेअंतर्गत चित्रकला स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट स्पर्धक म्हणून निवड झालेले कु.खिनालाल बळिरामजी ठाकरे,कु.उमेश भरतजी ठाकरे, यशश्री दिपक तऱ्हेकार, मिहीर विलास हजारे या स्पर्धकांना संस्थेअंतर्गत बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले तर मंडळाने खूप सुंदर चांगल्याप्रकारे उपक्रम राबविला त्यामुळे शैलेश बहुउद्देशीय सामाजिक संस्था राजनी या संस्थेअंतर्गत सार्वजनिक तरुण उत्साही लक्ष्मी मंडळांचा सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच राजनी येथील खेमराज नारायणजी तिघरे रहिवासी असलेले व नैनपुर ता.वडसा देसाईगंज येथील नगरपरिषद शाळा नैनपुर येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले व महाराष्ट्र काॅग्रेस कमेटि अंतर्गत पुरस्कार प्राप्त झालेले खेमराज नारायण तिघरे यांचा तरुण उत्साही लक्ष्मी मंडळ व ग्रामपंचायत आणि राजनी येथील गावकऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले तसेच शैलेश बहुउद्देशीय सामाजिक संस्था राजनी चे सचिव संस्थापक देवचंद कावळे यांचा सत्कार करण्यात आले.यावेळी सरपंच संदिप मेश्राम, उपसरपंच गोपाल तऱ्हेकार, मनोजकुमार ठाकरे सदस्य, गोपाल प्रधान त.मु.अध्यक्ष, गुरुदेव तिघरे पो.पा.,नरेश ठाकरे माझी त.मु.अध्यक्ष,संजु तिघरे, नंदलाल बगमारे,प्रमोद ठाकरे, तुकाराम ठाकरे व तरुण उत्साही लक्ष्मी मंडळांचे सर्व सदस्य व गावकरी उपस्थित होते.





Social Plugin