बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
जाखणगावचे युवा नेतृत्व, माजी उपसरपंच, पाणी फाऊंडेशनचे सातारा-कोरेगाव-खटाव तालुका समन्वयक, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला सोडचिठ्ठी देत जाखणगाव, गादेवाडी, आमलेवाडी, दौंडेवाडी, रामोशीवाडी गावच्या हजारो कार्यकर्त्यांसह आमदार महेश शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जितेंद्र शिंदे यांच्या पक्ष प्रवेशामुळे जाखणगाव-जांब भागात आमदार महेश शिंदे यांची राजकीय ताकद वाढली आहे.जाखणगाव येथील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पक्षप्रवेश घेण्यात आला. आमदार महेश शिंदे, दगडूदादा शिंदे, डॉ. प्रिया शिंदे, मानाजी शिंदे, बाळासो गाढवे, ज्ञानेश्वर जाधव, शशिकांत रोमन यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार महेश शिंदे म्हणाले, जाखणगाव माझे गाव आहे. या गावाने कायम साथ दिली. राजकीय यश दिले. येथील आपल्या माणसांनी प्रेम दिले. त्यामुळेच आमदार म्हणून काम करण्याची संधी दोन वेळा मिळाली आहे. या प्रेमातून उतराई होत गावच्या विकासासाठी कायम प्राधान्य दिले आहे. गावातील कामे मार्गी लावली आहेत. प्रलंबित कामे भविष्यात पूर्ण करणार आहे. सिंचन योजना मार्गी लागणार आहेत. गाव एकसंघ असेल तर निश्चितपणे विकासात्मक बदल होतो. जितेंद्र शिंदे यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून मोठे काम केले आहे. राजकारण करताना त्यांनी समाजकारणाला प्राधान्य दिले आहे. आज हजारो कार्यकर्ते शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे ताकद मिळाली आहे.
जितेंद्र शिंदे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेससोबत अनेक वर्षे काम केले. कायम गावच्या विकासासाठी प्राधान्य दिले आहे. जाखणगावचे महेश शिंदे आमदार झाले. त्यांनी गाव व परिसरातील विविध गावांमध्ये विकासकामे केली आहेत. जिहे कठापूर जलसिंचन योजना मार्गी लावली आहे. जांबपासून जाखणगावपर्यंत या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यांच्याकडे विकास कामांची दृष्टीआहे. ते व्हिजन असणारे नेते आहेत. त्यांनी या भागाचा कायापालट केला आहे. त्यामुळेच त्यांची पाठराखण करण्याचा निर्णय घेत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे.
अमोल भोसले, सुरेश पवार, नवनाथ मोरे, बाळासो मोरे, अमृत कदम, मधुकर जाधव, मोहन मोरे, रघुनाथ साळुंखे, बाळासो जाधव, सरपंच बाबूराव जाधव, राजेंद्र गायकवाड, नवनाथ मदने, युवराज मदने, बापूराव मदने, दिवाकर मदने, दत्तात्रय मदने, भगवान मदने, शिवराम मदने, रवि फौजी, शिवाजी शिंदे, ऋषी शिंदे, सर्जेराव जाधव, राजेंद्र गाढवे, संदिप पाटील, योगेश शिंदे, विराज शिंदे, सतीश शिंदे, धनाजी शिंदे, नारायण शिंदे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी महेश शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.





Social Plugin