Ticker

6/recent/ticker-posts

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल समीर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रा.



सिल्लोड नगर परिषद निवडणूक 2025 च्या अनुषंगाने शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल समीर अ. सत्तार तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सिल्लोड शहरातील प्रभाग क्रमांक 1 व 5 मधील जय भवनी नगर, श्रीकृष्ण नगर, नर्सरी परिसरात शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल समीर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्र काढण्यात आली होती. 

या पदयात्रेस मतदार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पदयात्रेत महिला भगिनींनी अब्दुल समीर यांचा औक्षण करून तर स्थानिकांनी शाल पुष्पहाराने स्वागत केले. सिल्लोड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीला मतदान करण्याचे अवाहन याप्रसंगी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मतदारांना केले.