Ticker

6/recent/ticker-posts

*धनगर पिंपरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंती उत्सवात साजरी करण्यात आली*



अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके     

अंबड तालुक्यातील धनगर पिंपरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिव जयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर शिव जयंती साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते. महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा ज्योतीराव फुले यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ असा एक पोवाडा लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली. जी पहिली शिवजयंती होती आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्याच अनुषंगाने ग्राम पंचायत कार्यालय धनगर पिंपरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला नमन व स्मरण करण्याच्या हेतुने शिवजयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सरपंच सरस्वती ताई कृष्णा पवार यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर उपसरपंच श्री विलास कचरे , ग्रामसेवक ढवळे साहेब व उपस्थितांनी पुजन केले. या कार्यक्रमाला सरपंच सरस्वती कृष्णा पवार उपसरपंच विलास कचरे ग्रामसेवक ढवळे साहेब , ग्रामपंचायत सदस्य संजय आबा जाधव .महिला बचत गटाच्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सह. शकुंतला मगर. व धनगर पिंपरी CRP सविता इंगळे व गावातील प्रतिष्ठित नागरिक नारायण वरे. कृष्णा पवार. प्रकाश ढवळे. जनार्दन मुळे. भानुदास आरगडे. प्रदीप इंगळे .विजय वरे. कृष्णा वरे. श्रीनिवास हरणे .किशोर सुराशे. रवी कुटे. रामेश्वर आरगडे. नंदू माने.शिवाजी नरवडे. ज्ञानेश्वर साळुंके. अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.