प्रतिनिधी-निरंजन बावस्कर
भोकरदन: भोकरदन नगरपालिका निवडणुकीची रंगत चरण सीमेवर पोहोचली असून संपूर्ण शहर निवडणुकीच्या चर्चेत रंगले आहे. घर घर भेटी प्रचार फेऱ्या अशा वातावरणात शहरात उत्सुकता शिगेला पोचली आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार संतोष दानवे यांनी मतदारांना थेट आव्हान केले की, भोकरदनच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग म्हणजे स्थिर नेतृत्व आणि सक्षम प्रशासन गेल्या काही वर्षात जे अपूर्ण प्रकल्प अडकून पडले ते पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. शहराच्या प्रगतीसाठी मतदारांनी भाजपला विश्व. आमदार दानवे यांनी शहरातील प्रमुख समस्या वर भाष्य करत असताना सांगितले की आमच्याकडे पाणीपुरवठा योजना अंतर्गत रस्ते ड्रेनेज आरोग्य सुविधा स्वच्छता मूलद्रव्यांना प्राधान्य देणारा विकास आराखडा तयार आहे.
व्यवस्थित नगर प्रशासन आणि पारदर्शक कामकाज हे पुढील पाच वर्षाचे ध्येय असल्याचे आमदार संतोष दानवे यांनी स्पष्ट केले. नगरपालिकेच्या कामकाजात पारदर्शकता आणि विकासाची नियोजन महत्त्वाचे असते. गेल्या काही वर्षापासून अडकून पडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सक्षम प्रशासनाची गरज आहे केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारा निधी व योजना यांचा शहरी भागात योग्य उपयोग करण्यासाठी चांगले नेतृत्व औषध आहे.
भोकरदन नगरपालिकेचा विकास हा केवळ घोषणाबाजीने नाही तर नियोजनपूर्वक कामाने शक्य आहे मतदारांनी कोणती दिशा शहराला द्यायची याचा निर्णय या निवडणुकीत होणार आहे असे आमदार आणि यांनी सांगितले. मतदान हा केवळ हक्क नाही तर शहराच्या भविष्याचा पाया आहे. नगरपरिषद जी साथ मिळाल्यास भोकरदन चा चेहरा बदलू शकतो असे आमदार दानवे म्हणाले.
या निवडणुकीत विविध पक्षाकडून उमेदवार मैदानात असून शहरातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहे रस्ते पाणी स्वच्छता कचरा व्यवस्थापन लाईट शहर सौंदर्यकरण क्रीडांगण अशा मूलभूत सोयी अशा मुद्द्यावर शहरात चर्चांना उधाण आले आहे.





Social Plugin