बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पुसेगाव पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत खटाव तालुक्यातील रामोशीवाडी (जाखणगाव) शिवारात अवैध गांजाची लागवड करणाऱ्या सचिन बापू मदने (वय ३५, रा. रामोशीवाडी, पो. जाखणगाव, ता. खटाव) यास अटक केली.
पुसेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामोशीवाडी (जाखणगाव) येथील येथील सचिन बापू मदने याच्या राहत्या घराच्या आजूबाजूच्या शेतात विक्री करण्याच्या उद्देशाने अवैध गांजाची शेती केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून ११.१५६ किलोग्रॅम वजनाची हिरवट पाने, फुले, बारीक काड्या, बीज व ओलसर पाने, खोड व मुळे असलेली ९ लहान मोठ्या आकाराची गांजाची झाडे जप्त केली. त्यांची किंमत सुमारे दोन लाख ऐंशी हजार रुपये इतकी आहे.या प्रकरणी सचिन बापू मदने याच्याविरुद्ध एन.डी.पी.एस अॅक्टप्रमाणे पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक पारितोष दातीर, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, मंगेश महाडीक, सनी आवटे, मुनिर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, हसन तडवी, अमृत कर्पे, अमित सपकाळ, राजू कांबळे, गणेश कापरे, धिरज महाडीक पुसेगांव पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार चंद्रहार खाडे, सुधाकर भोसले, योगेश बागल, विपूल भोसले, अमृता चव्हाण, तात्या ढोले, अशोक सरक, रेश्मा भोसले, दर्याबा नरळे यांनी कारवाईत सहभाग घेतला असून सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले.





Social Plugin