अजिंठा बुलढाणा रोडवर वाल सांवगी फाट्या जवळ अल्टो कार सह गोवंश जातीचे मास विनापरवाना अवैध रित्या विक्री करण्या साठी वाहतूक करताना पारध पोलीसांनी पकडले. अल्टो कार सह दोघे जण पोलीसांच्या ताब्यात.
भोकरदन प्रतिनिधी संजीव पाटील.
अजिंठा बुलढाणा रोडवर वाल सांवगी फाट्या जवळ अल्टो कार सह गोवंश जातीचे मास पकडले. पारध पोलीसांची कामगिरी । भोकरदन तालुका प्रतिनिधी संजीव पाटील।। भोकरदन तालुक्यातील अजिंठा ते बुलढाणा रोडवर वाल सांवगी फाट्या जवळ आज रविवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 5.50 वाजता गोवंश जातीचे मास मारुती सुझुकी अल्टो कार सह पकडले. याबाबत पारध पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आझम शेख कादर रा. मोताळा ता.मोताळा जिल्हा बुलढाणा आणि तोफिक खलील कुरेशी रा.शिवना जिल्हा छत्रपती संभाजी नगर हे दोघे जण विनापरवाना अवैध रित्या विक्री करण्या साठी अल्टो कार मध्ये गोवंश जातीचे मास विनापरवाना अवैध रित्या वाहतूक करताना मिळुन आले . याबाबत पारध पोलीसांनी गु.र.न.,291/2025, कलम 325 बि.एन.एस. 2023 सह कलम 5 C 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.120 किलो वजनाचे 60,000 हजार रुपये किंमतीचे गोवंश जातीचे मास आणि 180000, रुपये किंमतीची अल्टो कार एकुण दोन लाख चाळीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी पो.काॅ.संतोष गुलाब जाधव यांच्या फिर्यादीवरून पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जायभाये हे अधिक तपास करीत आहेत.पो.काॅ.सुनील सुखदेव जाधव, संतोष गुलाब जाधव, साहाय्यक फौजदार जायभाये यांनी ही कामगिरी पार पाडली.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जायभाये हे करीत आहेत.





Social Plugin