बाळासाहेब बोधक ग्रामिण प्रतिनिधी
नेवासा तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मुकिंदपूर गण अनुसूचित जातीसाठी राखीव ठरल्यानंतर स्थानिक राजकारणात चांगलीच चैतन्याची लाट निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर रांजणगावचे सरपंच सोपान लोखंडे यांनी रवीता बाबासाहेब जावळे यांच्या उमेदवारीची खुली मागणी केली आहे.
रवीता जावळे या सामाजिक कार्यात सक्रिय असून, महिलांसाठी व ग्रामविकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. सरपंच लोखंडे यांनी म्हटले की, “ रविता जावळे या सक्षम, शिक्षित आणि लोकाभिमुख व्यक्ती असून मुकिंदपूर गणाचे नेतृत्व करण्यास त्या योग्य आहेत.” त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला अधिक वेग आला आहे.





Social Plugin