पाणी बांधावर पोचले पण शिवसेनाप्रमुखांचा नेत्यांना विसर पडला
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
जिहेकठापूर योजना ही १९९५ साली युतीचे सरकार सत्तेवर येताच दुष्काळी तालुक्याला पाणी देन्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करून कर्जरोखे उभारून कामाची सुरुवात केली . आमचे पाणीपुजन श्रेयवादासाठी नाही . पाणी बांधावर पोचले पण शिवसेनाप्रमुखांचा नेत्यांना विसर पडला आहे , असे शिवसेनेचे शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांनी सांगितले . ते पुढे म्हणाले की ,एक काळ असा होता की खटाव माण म्हटले की, दुष्काळी कमी पर्जन्य वृष्टी होणारा असा दुष्काळी भाग, कोणताही रोजगार उपलब्ध नाही ,पोटाची खळगी भरण्यासाठी हा पूर्ण भाग मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी रोजगारासाठी जात होता . पूर्ण दुर्लक्षित असा हा भाग, परंतु हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपाशीर्वादाने या भागाचे आता नंदनवंदन झाले आहे . जिहे कठापुर सारखी योजना हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली . राज्यात युतीचे सरकार आले . यावेळी स्वतः साहेबांनी या योजनेकडे लक्ष देऊन भरीव निधी टाकला .
स्वतः या योजनेची पाहणी करून अभियंत्यांना बरोबर घेऊन ही योजना कार्यान्वित केली . हा भाग सुजलाम सुफलाम व्हावा, असे स्वप्न साहेबांचे होते .मधल्या कालावधीत काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार महाराष्ट्रात आले व निधी अभावी योजना पुन्हा रेंगाळली . यासाठी खटाव माणमधील सर्व लोकप्रतिनिधींनी मोठा लढा उभारला . या योजनेसाठी सर्वच नेत्यांचे योगदान महत्त्वाचे आहे . या आंदोलनावेळी शेकडो शिवसैनिकांच्यावर मोठे गुन्हे दाखल झाले आहेत . आज रोजी ते न्याय प्रविष्ट आहेत . पुन्हा सरकार आले .सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मोठे प्रयत्न केले व ही मान्यता मिळवून दिली . हे विसरून चालणार नाही याची कल्पना तमाम जनतेला ही आहे . आज ते पूर्णत्वाकडे जात आहे . स्थानिक लोकप्रतिनिधींनी यासाठी मोठे परिश्रम घेतले आहेत .भागातील कानाकोपऱ्यात योजनेचे पाणी जात आहे . त्याचा आनंद आहे ,परंतु या योजनेचे पाणी पूजन होत आहे .भूमिपूजन होत आहेत परंतु हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या योजनेचे जनक त्यांच्या नावाचा उल्लेख होत नाही, ही मोठी खंत शिवसैनिकांमध्ये आहे . या सरकारला व लोकप्रतिनिधींना हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विसर पडू नये हीच इच्छा .येत्या एक तारखेस सोमवारी सायंकाळी सहा वाजता शिवसेनेच्या वतीने या योजनेवर दिपू उत्सव साजरा करण्यात येणार आहे . या कार्यक्रमास शिवसेनेचे संपर्कप्रमुख व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष नितीन बानगुडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन होणार आहे .यावेळी शिवसेना उपनेते छायाताई शिंदे व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत . अशी माहिती तालुकाप्रमुख संजय नांगरे यांनी दिली
शपथविधीचा कार्यक्रम दोन्ही लोकप्रतिनिधींनी ठिकाण बदलावे .परमपूज्य श्री सेवागिरी महाराज देवस्थानचा राजकीय व्यासपट करू नये...
.jpg)




Social Plugin