सिल्लोड येथे नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या नाना - नाणी पार्कचे लोकार्पण करून आमदार सत्तार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सिल्लोड येथे छत्रपती संभाजीनगर - जळगाव महामार्गापासून जवळच महाराणा प्रताप चौक लगत शहर वासीयांसाठी नाना-नाणी पार्क उभारण्यात आले. या पार्क मध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी व त्यांच्या शारीरिक वृद्धी साठी येथे विविध क्रीडा साहित्य उपलब्ध असून ज्येष्ठ नागरिकांना सकाळ - संध्याकाळी फिरण्यासाठी सिमेंट रस्ते करण्यात आले आहे. अतिशय निसर्गरम्य पध्दतीने नाना नाणी पार्क उभारण्यात आले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यानी याप्रसंगी केले.





Social Plugin