Ticker

6/recent/ticker-posts

कायगाव येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपावली स्नेहमीलन उत्साहात संपन्न



सिल्लोड/प्रतिनिधी आकाश पा कोके 

सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना व युवासेनेतर्फे आयोजित दीपावली स्नेहमीलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. केन्हाळा सर्कलमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्याम ळे प्रत्येक जागेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी पूर्ण तयारीने काम ाला लागा. केन्हाळा सर्कलमध्ये निश्चितच बदल होईल आणि शिवसेनेचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, तालुक्यात सर्कल गणनिहाय प्रचार कार्यालय सुरु करा, बूथ यंत्रणा मजबूत करा, युवकांची मजबूत फळी निर्माण करा, महिलांचे संघटन करा व मतदार याद्या तपासा. विकासाच्या म बाध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावात निधी दिला असून, शेतकरी दोन पिके घेणारा व्हावा यासाठी सिंचन कामांना प्राधान्य दिले आहे. निवडणुकीत विकास हाच आपला अजेंडा आहे. विरोधक जातीपातीचे राजकारण करून भूलथापा मारण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपण सकारात्मक भूमिका ठेवा विजय आपलाच आहे, असे आमदार सत्तार म्हणाले. कार्यक्रमास जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा.गाडे, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव था. तायडे,कृउबा समितीचे सभापती विश्वास पा. दाभाडे, माजी सभापती रामदास पालोदकर, संचालक व शिवसेना सर्कल प्रमुख नंदकिशोर सहारे, हनिफ मुलतानी, सुखदेव जाधव, संजय डमाळे, अक्षय मगर, मीराबाई शिंदे, भागुबाई शिंदे, जम और मुलतानी, बाळू दौगे, दिलीप जाधव,नारायण भोसले, सुभाष लोणीकर,आकाश कोके, परमेश्वर जिवरग, बांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.