बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ] ललगुण ता . खटाव येथे ललगुण ते नेर जाणाऱ्या रोडच्या पश्चिमेस असणाऱ्या विहीरीत पार्वती तानाजी शिरतोडे ( वय ५५ वर्ष ) यांचे प्रेत पाण्यात तरंगत असताना सापडले . या घटनेची नोंद पुसेगाव पोलिस स्टेशनला झाली आहे . याबाबत पती तानाजी खाशाबा शिरतोडे ( वय ६२ वर्ष ) यांनी पोलीसांना खबर दिली . याबाबत अधिक माहिती अशी , पार्वती शिरतोडे या दि .१ नोव्हेंबर रोजी मुलगी रूक्मीणी नानासो चव्हाण रा . कासारवाडी ता . माण हिच्याकडे दिवाळी सणासाठी गेल्या होत्या . त्या दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ललगुण गावी घरी आल्या होत्या . त्या सायंकाळी ५च्या सुमारास घरातुन कोठेतरी निघून गेल्या होत्या . पण त्या घरी आल्या नसल्यामुळे गावात व नातेवाईकांच्याकडे शोध घेतला परंतु तपास लागला नाही . आज सकाळी ७च्या सुमारास शोध घेतला असताना ललगुण ते नेर जाणाऱ्या रोडच्या पश्चिमेस अरुण सर्जेराव घाडगे यांच्या विहीरीच्या पाण्यात एक स्त्री जातीचे प्रेत तरंगत असताना मिळून आले . याबाबत पुसेगाव पोलिस ठाण्याला माहिती दिल्याने विहीरीच्या पाण्यातून ते प्रेत बाहेर काढले . ते पार्वती शिरतोडे यांचे असल्याचे लक्षात आले .पार्वती शिरतोडे यांना कंबर ,सांधेदुखीचा आजार असल्यामुळे त्या त्रस्त होत्या . या घटनेची आकस्मीत नोंद पुसेगाव पोलिस स्टेशनला झाली असून पुढील तपास चंद्रहार खाडे करित आहेत .





Social Plugin