Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद हायस्कूल मंगरूळ नवघरे येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न



 प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी 

दिनांक 20/11/2025 रोज गुरुवारला प्राथमिक आरोग्य केंद्र, मंगरूळ नवघरे द्वारे विद्यार्थ्याचे आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये वर्ग पाचवी ते दहावीचे विद्यार्थी होते. प्रत्येक विद्यार्थ्याचे आरोग्य तपासणी करून त्यांचे समस्या जाणून घेतली आणि मार्गदर्शन व औषधी देण्यात आली. या कार्यक्रमासाठी  प्रमुख मार्गदर्शक डॉ. आरिफ बैग,डॉक्टर प्रतीक्षा वायाळ,  प्रभाकर डुकरे,अर्चना पाटील यांनी तपासणी केली.

  या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती हायस्कूलचे श्री वायाळ सर,घुगे सर,गोसावी सर, नेवारे मॅडम, भालेराव मॅडम, तोंडे सर, उंबरकर ताई व पाचवी ते दहावीचे विद्यार्थी हजर होते.