Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेनेच्या कॉर्नर बैठकीस मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

 


सिल्लोड/ (प्रतिनिधी)- आकाश कोके 

शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल समीर अ. सत्तार तसेच शिवसेना नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर बैठकीस मतदारांचा उत्स्फूर्त मिळत आहे. प्रतिसाद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अब्दुल समीर अ. सत्तार यांच्या उपस्थितीत शहरातील मोगलपुरा तसेच भारत नगर भागात सायंकाळी झालेल्या कॉर्नर बैठकीस मतदारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

अब्दुल समीर यांनी उपस्थित मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता सिल्लोड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीसमोर मतदान करून शिवसेनेच्या नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन अब्दुल समीर यांनी केले.

याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी सुदर्शन अग्रवाल, विठ्ठल सपकाळ, अकिल वसईकर, आसिफ बागवान, शंकरराव खांडवे, इम्रान शेख, रईस पठाण, बबलू पठाण, शिवा टोम्पे, हाजी मसर्रत, जुम्मा खा पठाण, राहुल प्रशाद, फहिम पठाण आदींची उपस्थिती होती.