Ticker

6/recent/ticker-posts

कन्हान नगरपरिषद निवडणुकीत धक्का!



रॉबिन निकोसे@नागपूर ग्रामीण प्रतिनिधी

कन्हान :— कन्हान शहरातील बहुजन समाजात प्रचंड मान-प्रतिष्ठा मिळवलेले, माँग गारुडी समाजातील बुद्धिजीवी आणि समर्पित कार्यकर्ता, माजी ग्रामपंचायत सदस्य माननीय नेवालाल नामदेवजी पात्रे यांची उमेदवारी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली असून समाजात प्रचंड असंतोष पसरला आहे.

गत 30 वर्षांपासून समाजकारणाची अखंड ज्योत पेटवून बहुजन समाजासाठी कन्हान शहरात कणा बनून उभे असलेले नेवाभाऊ पात्रे हे दरवेळी नगरपरिषद निवडणुकीत आपला अर्ज भरत आले. परंतु प्रत्येक निवडणुकीत काही मोठ्या राजकीय नेत्यांच्या दबावामुळे, कटकारस्थानामुळे किंवा बनावट तांत्रिक कारणांमुळे त्यांचा अर्ज अपात्र ठरवल्याचा आरोप समाजातून जोरात होत आहे.

 पहिल्या नगरपरिषद निवडणुकीपासून सुरू कटकारस्थान?


पहिल्या निवडणुकीत पात्रे यांचा अर्ज भरताना झालेल्या ‘योजित’ चुकीमुळे तो रद्द करण्यात आला होता. नंतर हे उघडकीस आले की ही चूक नसून काही वरच्या स्तरातील नेत्यांनी रचलेले कटकारस्थान होते—पात्रे रणभूमीत उतरूच नयेत म्हणून!

 यावर्षीही बी-फॉर्मचे राजकारण; तिकीट नाकारले!


यंदाच्या निवडणुकीतही नेवाभाऊंचा फॉर्म योग्य, वैध आणि नियमबद्ध भरलेला असतानाही केवळ बी-फॉर्मच्या गोंधळाचे कारण देत पक्षाने त्यांना तिकीटच नाकारले. यामुळे समाजात प्रचंड रोष उसळला आहे.

बहुजन समाजात निराशेची लाट


पात्रे यांना कन्हान शहरातील बहुजन समाजाचा अत्यंत प्रभावी, खंबीर आणि सर्वात चर्चित उमेदवार मानले जात होते. समाजकारणात त्यांची प्रतिमा, त्यांची निष्ठा आणि लोकांमध्ये असलेले वट पाहता “यावेळी ते नक्की धडाक्यात निवडून येणार!”असा विश्वास लोकांमध्ये होता.परंतु उमेदवारीच बाद झाल्याने समाजात संतापाची लाट उसळली असून अनेकांच्या मनात एकच प्रश्न“पक्षातील काही नेते कोणाच्या इशाऱ्यावर हा अन्याय करत आहेत?”

 बहुजन समाज एकमताने म्हणत आहे 


“नेवाभाऊंवरचा अन्याय आम्ही सहन करणार नाही!”
“सत्याला थांबवण्याचा प्रयत्न केला की आंदोलन उभं राहतंच!”

कन्हान शहरात सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा असून पक्षातील संबंधित पदाधिकाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.