वैभव सोळंके/तालुका प्रतिनीधी
चनई, ता. अंबाजोगाई, जि. बीड: खंडोबा मंदिर देवस्थान, चनई येथे यावर्षी रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह, श्री तुकोबाराय चरित्र कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची भव्य श्रृंखला मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. 21 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आयोजित कार्यक्रमात विविध प्रख्यात कीर्तनकारांचे प्रवचन, कीर्तन व भजनी कार्यक्रम रंगणार आहेत.
कार्यक्रमाचा शुभारंभ शुक्रवार, 21 नोव्हेंबर रोजी सकाळी विनापूजन , दुपारी महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या कथा, आणि सायंकाळी ह.भ.प . किसान महाराज पवार यांचे कीर्तन व भजनी मंडळाच्या गायनाने झाला. पुढील सात दिवसांत ह.भ.प., विनायक महाराज काचगुंडे, ह.भ.प, पुरुषोत्तम महाराज पाटील,अच्युत महाराज दस्तापूरकर , युवकवीर माऊली महाराज पठाडे , ह.भ.प.विलास महाराज गेजगे व ह.भ.प .समाधान महाराज शर्मा आदी नामांकित कीर्तनकार प्रवचनाच्या माध्यमातून संतविचार, भक्तीभाव आणि तुकोबारायांचे चरित्र सादर करणार आहेत.
सप्ताहात दररोज सकाळ-संध्याकाळ हरिनाम, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, प्रवचन तसेच विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समारोप 28 नोव्हेंबर ह.भ.प.रोजी महादेव महाराज बोराडे यांचे काल्याचे कीर्तन संपन्न होनार आहे
या पवित्र सोहळ्याचे आयोजन खंडोबा मंदिर देवरस्थान समितीच्या मार्गदर्शनाखाली होत असून, परिसरातील भाविकांकडून मोठ्या संख्येने सहभाग मिळत आहे. भक्तांसाठी प्रसाद व विविध सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सर्व गावातील भाविक भक्तांनी या सप्ताहाला उपस्थित राहून शोभा वाढवावी.





Social Plugin