प्रतिनिधी:-लक्ष्मण बिल्हारे
दिनांक २२/११/२०२५ रोजी जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा गंज परतुर येथे केंद्रस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख श्री.बाबासाहेब तरवटे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.विष्णु ढवळे सर होते. केंद्रातील वर्ग १ ली ते वर्ग ५ वी. गटासाठी एकूण १२ शाळांनी सहभाग नोंदवला तर वर्ग ६ वी. ते वर्ग ८वी. गटासाठी ६ शाळांनी सहभाग नोंदवला.
विजयी संघ
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलखेड
१)लहान गट १ ते ५
कु.गौरी बाबासाहेब सुरुंग
चि.रुद्र कृष्णा सुरुंग
कु.कल्पना विष्णू निकम
कु.स्वरा सिद्धेश्वर लहाने
२)मोठा गट ६ ते ८
कु.दिव्या बाबासाहेब सुरुंग
कु.दिव्या बाबासाहेब झुटे
कु.सुप्रिया अनिल सुरुंग
कु.गायत्री तुळशीदास बिल्हारे
या दोन्ही गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलखेड या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन श्री. भाग्यवंत सर, श्री. राजबिंडे सर, श्री. सुरेश राठोड सर, श्रीमती सोईतकर मॅडम, श्री. वावरे सर, यांनी केले तर स्पर्धेचे गुणदान श्री. मुंडे सर, श्री. गिरी सर, श्रीमती संध्या मॅडम, श्रीमती जाधव मॅडम.श्रीमती येडपलवार मॅडम, तर निरीक्षक म्हणून श्री. सोपान धुमाळ सर, श्री. विष्णू ढवळे सर.श्री. तोटे सर यांनी काम पाहिले.
याप्रसंगी केंद्रातील शिक्षक श्री. वाकळे सर, श्री. राऊत सर श्रीमती गवई मॅडम,श्री. कुलथे सर यांची उपस्थिती होती. विजयी संघाला बीटस्तरीय स्पर्धेसाठी सर्वांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या .त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलखेड शाळेचे मुख्याध्यापक श्री. खवल सर व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष :-श्री. लक्ष्मण बिल्हारे उपाध्यक्ष:- श्री.सुनिल सुरुंग व सर्व सन्माननीय सदस्य शालेय व्यवस्थापन समिती वलखेड यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .
स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतील मुख्याध्यापक श्री.खवल सर श्री.वावरे सर श्री. इरले सर श्रीमती रुद्रे मॅडम श्री.राजबिंडे सर श्री.केवारे सर यांनी मार्गदर्शन केले





Social Plugin