Ticker

6/recent/ticker-posts

अंबड नगरपरिषद निवडणूक २०२५:भाजप-रासप महायुतीच्या नगराध्यक्ष प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न



अंबड प्रतिनिधी गणेश सपकाळ


अंबड नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर,भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) महायुतीच्या अधिकृत नगराध्यक्ष प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच "सबका साथ,सबका विकास"या घोषणेसह उत्साहात पार पडले.
भाजप-रासप महायुतीच्या उमेदवारांसाठी असलेले हे प्रचार कार्यालय,माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.श्री.रावसाहेब पाटील दानवे,माजी मंत्री आमदार श्री.बबनरावजी लोणीकर,आमदार नारायण कुचे व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ देवयानी केदार कुलकर्णी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.यावेळी झालेल्या सभेत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा संकल्प केला. यावेळी बोलताना,'भाजपाला मत म्हणजे विकासाला मत,'हा संदेश देण्यात आला आणि अंबड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचा नगराध्यक्ष व नगरसेवक या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
या उद्घाटन समारंभास माजी आमदार श्री.विलास बापू खरात,भाजप नेते सतीश घाटगे पाटील,अनिलराव कोलते पाटील,अवधूत नाना खडके,रमेश भाऊ पैठणे,केदार दादा कुलकर्णी,बद्री भाऊ पठाडे,जितेंद्र पालकर,देविदास कुचे,डॉ.राजेंद्र ठोसर,औदुंबर बागडे,राहुल शहाणे,विश्वजीत खरात,गंगाधर वराडे,राम शेळके,सौरभ कुलकर्णी,भगवान म्हात्रे,संदीप आंधळे,अंकुशराव बोबडे यांच्यासह उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच मतदार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.