Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा; सिंदखेड राजा नगरपरिषदेच्या रणधुमाळीत समीकरणे बदलणार



  [ सिंदखेडराजा नगरपरिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ला पाठिंबा; निवडणुकीत नवे समीकरण घडणार!” ]

सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेडराजा : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक राजकारणात मोठे राजकीय समीकरण घडले आहे. वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला औपचारिक पाठिंबा जाहीर केला असून त्यामुळे निवडणूक रंजक होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष, मधुकर साळवे यांनी पक्षाच्या नेत्या सविताताई मुंढे यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांची भेट घेतली. यावेळी, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अधिकृत पाठिंब्याचे पत्र डॉ.शिंगणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

'या पाठिंब्यामुळे सिंदखेड राजा नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (उबाठा) पक्षाची ताकद लक्षणीय वाढली आहे. आणि ही आघाडी आता निवडणुकीत निर्णायक 'लीड' घेईल' अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन हा निर्णय एकमताने घेतला. सामाजिक न्याय, सक्षम स्थानिक नेतृत्व आणि विकासाभिमुख धोरणांना पाठबळ देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या उमेदवारांना या पाठिंब्यामुळे निवडणूक लढाईत बळ मिळणार असून इतर पॅनेलसमोर मजबूत आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. सिंदखेडराजा नगरपरिषदेत या नव्या राजकीय समीकरणामुळे निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत मिळाले आहेत.