Ticker

6/recent/ticker-posts

कृषी महाविद्यालयात सेंद्रिय व जैविक ड्रॅगन फ्रुट व्यवस्थापना बद्दल मार्गदर्शन .



गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी

कारंजा तालुका प्रतिनिधी_दारव्हा कृषी महाविद्यालयात सेंद्रिय आणि जैविक पद्धतीने ड्रॅगन फ्रुट व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून अजय मोटघरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीतील विविध संकल्पना सोप्या आणि आकर्षक पद्धतीने समजावून सांगितल्या.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य खाडे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करताना त्यांना श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. तसेच महाविद्यालयातील अनुभवी प्राध्यापक जोशी यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

व्याख्यानात विद्यार्थ्यांना सेंद्रिय व जैविक शेतीत वापरल्या जाणाऱ्या विविध सूक्ष्मजीवांचे महत्त्व सांगण्यात आले. त्यामध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बेसिल्प्स, बायोफन्जीसाईट, बायो फर्टीलायझर, जसे पीएसबी,केएमबी, अंझाटो डशबॅक्टर यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. ड्रॅगन फ्रुटमध्ये रोग व्यवस्थापन, परागकण व्यवस्थापन, मातीतील जैविक क्रियाशीलता आणि उत्पादनवाढीमध्ये या जैविक घटकांचे योगदान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे समजावून सांगण्यात आले.

या मार्गदर्शन कार्यक्रमास विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी विषय अत्यंत उत्सुकतेने ऐकला. हसत-खेळत, संवादात्मक पद्धतीने घेतलेल्या या सत्रामुळे विद्यार्थ्यांनी शेतीविषयक ज्ञान अधिक उत्साहाने आत्मसात केले.

कार्यक्रमाच्या शेवटी मार्गदर्शक अजय मोटघरे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांची सकारात्मक ऊर्जा आणि शिकण्याची उत्सुकता पाहून मला देखील समाधान वाटले.” प्राचार्य खाडे सरांनी मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त करत विद्यार्थ्यांना अशा उपयुक्त कार्यक्रमातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.