कारंजा लाड प्रतिनिधि पराग कु-हे
कारंजा पोलीस स्टेशन कारंजा शहर अंतर्गत ३० नोव्हेंबर रोजी नगर परिषद निवडणूकच्या अनुषंगाने सदर निवडणुका शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी शहरातून रूटमार्च काढण्यात आला
जिल्हा पोलिस अधिक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती लता फड यांच्या सुचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली तथा पोलिस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला व ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे यांच्या उपस्थितीत नगरपरिषद कार्यक्षेत्रातील मिश्र वस्ती, जातीयदृष्ट्या संवेदनशील भागात एरिया डॉमिनेशन तथा कॉन्फिडन्स बिल्डींग करिता रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्चचा मार्ग पोलीस स्टेशन येथू सुरू होऊन दाइपुरा, मंगळवारा, दारव्हा वेश, संभाजी चौक, हातोटीपुरा, फुले चौक, नगीना मज्जिद, मेन लाईन, नेहरू चौक, टिळक चौक, दत्त मंदिर चौक, शनी मंदिर, रामसावजी चौक, परत पो.स्टे. येऊन समाप्त झाला. सदर एरिया डॉमिनेशन दरम्यान शाळा, हायस्कूल अशा एकूण ४ शाळा व २१ मतदान केंद्राना भेट दिल्यात. सदर रूट मार्च करिता एकूण ८ अधीकारी, ९० अंमलदार व १२० होमगार्ड हजर होते





Social Plugin