( प्रतिनिधी) सोनपेठ शिवशंकर तुपकर
ऊस तोड बंद करण्यासाठी टायर जाळुन ईशारा आंदोलन.
ऊसाला प्रती टन तीन हजार रुपये पहिली उचल मिळावी यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी खडका व सायखेडा पाटीवर टायर जाळुन ऊस तोड व वाहतुक बंद करण्याचा ईशारा दिला आहे.
बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाच्या पहिल्या उचली साठी सुरु केलेल्या आंदोलनाचे लोन आता सोनपेठ तालुक्यात पसरु लागले आहे. सोनपेठ तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एक बैठक घेऊन ऊसाला पहिली उचल तीन हजार रुपये मिळावी या साठी खडका येथील व्टेन्टीवन शुगर या करखान्यावर दि १ डिसेंबर सोमवार रोजी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे त्या साठी तालुक्यातील ऊस उत्पादक गावोगावी बैठका घेत असुन उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केल्या जात आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दि २९ रोजी सायखेडा कारखान्याच्या दोन्ही बाजुला खडका व सायखेडा पाटीवर टायर जाळुन तालुक्यातील ऊस तोड व वाहतुक बंद करण्याचा ईशारा ऊस उत्पादक आंदोलकांनी दिला आहे.
या आंदोलनास परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. गंगाखेड येथील प्रचार सभेत ऊस दराची मागणी सायखेडा येथील २१ शुगरचे सर्वेसर्वा आअमित देशमुख यांच्या प्रचार सभेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस दरा बाबत विचारणा केली . यावेळी पोलीसांनी विचारणा करणाऱ्या रामेश्वर मोकाशे, सुरेश ईखे व ओकांर पवार यांना ताब्यात घेतले.





Social Plugin