Ticker

6/recent/ticker-posts

सादोळा सेवा सहकारी सोसायटीचा ऊस आंदोलनाला एकमताने पाठिंबा












































ऊस उत्पादकांनी योग्य दरासाठी छेडलेल्या कोयता बंद आंदोलनाला जिल्हाभरातून व्यापक समर्थन मिळत असताना सादोळा सेवा सहकारी सोसायटी संस्था मर्या. यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत एकमताने समर्थन जाहीर केले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढ्यात संस्थेच्या संचालक मंडळाने घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय स्थानिक पातळीवर आंदोलनाला नवे बळ देणारा ठरत आहे.

सोसायटीच्या संचालक मंडळाने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “शेतकरी हा आपल्या व्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी अडचणीत आला असताना त्याच्या पाठिशी उभे राहणे ही केवळ नैतिक जबाबदारी नाही, तर सोसायटीचे कर्तव्यही आहे.” ही भावना लक्षात घेऊन सर्व संचालकांनी एकमताने ठराव मंजूर केला आणि हा अधिकृत ठराव युवा संघर्ष समिती, माजलगाव यांना सुपूर्द करण्यात आला.

या ठराव सुपूर्दगी प्रसंगी सेवा सहकारी सोसायटी सादोळा यांच्या वतीने  - चेअरमन प्रदीप भगवानराव सोळंके, - रेशन दुकानदार अनिरुद्ध तात्या सोळंके,
- संचालक भाई लहू सोळंके, विनोद सोळंके, तसेच इतर सर्व संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अजय राऊत, नारायण गोले, कृष्णा सोळंके, तुकाराम नावडकर, मोहन जाधव, नामदेव सोजे, सुहास झोडगे, अशोक सोळंके आदी शेतकरी उपस्थित राहिले.सादोळा सोसायटीच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सामाजिक संस्थांचा मिळणारा पाठिंबा अधिक वाढताना दिसत असून ऊस दरवाढीसाठीचा लढा अधिक व्यापक होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.