Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद हायस्कूल साकरीटोला येथे संविधान दिन उत्साहात साजरा

   


26 नोव्हेंबर, साकरीटोला

"उठ नागरिका जागा हो... संविधानाचा धागा हो" अशा उद्घोषात आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी बुधवार ला जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय साखरीटोला येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

    सकाळी १०:१५ वाजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान पुस्तक प्रतिमेला मानवंदना करून संविधान दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रगीत व संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आलं. त्यानंतर कवायतीचे प्रदर्शन करत मिरवणूक काढण्यात आली. "लोकशाहीचा जागर, संविधानाचा आदर", "संविधानाचा करू प्रचार तुमचा आमचा एकच विचार", "जातीयतेच्या बेड्या तोडू, संविधानाने भारत जोडू",  "संविधान सर्वांसाठी.. हक्कासाठी, न्यायासाठी", "उठ नागरिका जागा हो, संविधानाचा धागा हो" विद्यार्थ्यांकडून दिलेल्या अशा विविध घोषणांनी साकरीटोला येथे संविधान व संविधान दिनाविषयी एक प्रकारची जनजागृती करण्यात आली. ह्या घोषणांची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रणय बहेकार, अर्पित हेमने, हार्दिक चुटे, हर्ष चुटे, ललिता बहेकार, जिगर बरबरैय्या, कर्तव्य कोरे, प्रणय शिवणकर, आर्यन दोनोडे, मनस्वी साहारे, कोमल हुकरे यांचे विशेष कौतुक करण्यात आले. हर्षु चुटे व ललिता बहेकार यांचे संविधान दिनाची महती सांगणारे फलक आकर्षणाचे केंद्र ठरले. साखरीटोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून गावातील नागरिक व सर्व विद्यार्थी यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केलं. ११ वाजेच्या सुमारास मिरवणूक शाळेत परत आल्यावर भाषण व गायन स्पर्धेला सुरुवात करण्यात आले. संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आद. कापगते सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे आद. कोडापे सर, मा. पवार सर, मा. थेर सर, मा. दोनोडे सर, मा. लांडगे सर, मा. खरवडे सर, मा. चौधरी मॅडम, मा. खंडाइत मॅडम, मा. हरीणखेडे मॅडम, मा. बैस मॅडम, मा. संदीपजी कटरे सर,  मा. बिलथरे सर, मा. कटरे मॅडम, मा. टेंभुर्णीकर मॅडम, मा. गौतम मॅडम हे होते.

   वासनिक सरांच्या काव्यपुष्पाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वर्ग पाचवीचा विद्यार्थी शौर्य मेश्राम यांनी उत्कृष्ट भाषण करून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला. तर गीत गायन स्पर्धेत वर्ग नववीची विद्यार्थिनी प्रांशी राऊत हिने संविधानपर उत्कृष्ट गीत गायन करून गीतगायनामध्ये प्रथम क्रमांक पटकविला. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना पेन व वही देऊन त्यांना गौरविण्यात आले.

     १२:३०  ते ०१:३० वाजता संविधान गौरव परीक्षेला बसलेल्या ६१ विद्यार्थ्यांची संविधान गौरव परीक्षा घेण्यात आली. आद. कापगते सर यांच्या निदर्शनात व परीक्षा केंद्रप्रमुख कोडापे सर यांच्या उपस्थितीत परीक्षा घेण्यात आली. परीक्षा पर्यवेक्षक म्हणून थेर सर व वासनिक सर यांनी भूमिका बजावली. परीक्षा संपल्यानंतर शाळेतील परिचर आणि शालेय पोषण आहार तयार करणारे स्वयंपाकी ताईंच्या मदतीने १:३० वाजे सर्व विद्यार्थ्यांना सुरुची भोज देण्यात आले.