Ticker

6/recent/ticker-posts

लहान शिवारात उसाच्या फडात बारा फुटाचा अजगर अडळून आला.





प्रतिनिधी /विश्वराज वाकोडे 

          लहान अर्धापूर तालुक्यातील लहान शिवारात बुधवारी सकाळी उसाच्या शेतांत भला मोठा अजगर सापडला असून त्यांची लांबी बारा फूट आहे. सर्पमित्राला बोलावून या अजगराला सिरक्षितपणे नैसगिक सानिद्यात सोडण्यात आले. पाहण्याऱ्याची मोठी गर्दी उसळी होती.

        लहान शिवारात प्रवीण लोणे यांच्या उसाच्या शेतात कामगार ऊस कापणी करीत होते. यावेळी अचानक एक भला मोठा अजगर त्यांच्या निदर्शनास आला. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा केला. नंतर सर्प मित्राला बोलावण्यात आले होते. सदर अजगरणे मोर गिळकृत्य केले होते. सर्प मित्र कपिल वसुरे यांनी अजगरला सर्तीचे पर्यंत करत सुरक्षितपणे ताब्यात घेतले.

       यावेळी उप वनरक्षक केशव बाबळे, सहायक वनसवरक्षक भारत खेळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन प्रेमी मंडळ अधीकारी मोकले व वनरक्षक लक्ष्मीमण शेळके, श्रीकांत कलने, पोलीस पाटील आनंद इंगळे यावेळी आदीचा समावेश होता. सर्प मित्र कपिल वसुरे, घनश्याम जाधव व वनविभागाच्या अधीकाऱ्यांच्या सहकार्याने या अजगरला सुरक्षितपणे नैसगिक अधिवासात सोडण्यात आले आहे.