Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगाव -कला व वाणिज्य महाविद्यालयात "नशा मुक्त भारत अभियान.



बुध दि[ प्रकाश राजेघाटगे ] 

 पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने "नशा मुक्त भारत अभियान" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. पी. भोसले उपप्राचार्य डॉ.ए.एस.जगताप, प्रा.डॉ.के.जी  कुंभार प्रा.डॉ.एच.जी.निमसे प्रा.डॉ.एन.डी.लोखंडे इ. उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. पी. भोसले म्हणाले," 

 समाजामध्ये वाढत्या व्यसनाधीनतेवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच युवकांना निरोगी, सुरक्षित आणि जबाबदार जीवनशैली अंगीकारण्यास प्रवृत्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . त्यांनी आपल्या भाषणात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नशापासून दूर राहून समाजासाठी आदर्श निर्माण करावा, असे सांगितले.तसेच त्यानी विद्यार्थ्यांना नशेची कारणे, दुष्परिणाम, प्रतिबंधक उपाययोजना आणि व्यसनमुक्तीची वैज्ञानिक प्रक्रिया याबाबत सखोल माहिती दिली. काही पुढील मुद्द्यांवर विशेष भर दिला युवकांमध्ये व्यसन वाढण्याची प्रमुख कारणे  ताण, चुकीची मैत्री, कुतूहल, सोशल मीडियाचा प्रभाव, कौटुंबिक वातावरण इ.नशेचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम शारीरिक अशक्तता, मानसिक ताण, नैराश्य, शिक्षणावर परिणाम, कौटुंबिक समस्या, स्वत:ला आणि मित्रांना नशेपासून वाचवण्याचे मार्ग योग्य संगत, ताण व्यवस्थापन, क्रीडा व कला क्षेत्रातील सक्रियता, परस्पर संवाद.कार्यक्रम प्रसंगी वास्तवातील उदाहरणे, चित्रफितद्वारे प्रेझेंटेशन आणि अनुभवकथनांद्वारे विद्यार्थ्यांना व्यसनाचे गांभीर्य पटवून दिले. “नशा ही समस्यांची सोडवणूक नसून ती समस्यांची सुरुवात असते,” असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना जागरूक राहण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी 

सर्व विद्यार्थ्यांनी  “नशा मुक्त समाज – निरोगी भारत” ही शपथ घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.के.एच. कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.एस.आर धोंगडे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.एच जी.निमसे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .